Ad will apear here
Next
‘मी शून्य’ शब्द-सुरांची मैफल
रेश्मा कारखानीसमुंबई : कवयित्री रेश्मा कारखानीस यांच्या लेखणीतून साकारलेल्या कविता, गीत, गझल, पोवाडा, अभंग अशा वैविध्यपुर्ण काव्यप्रकारांचे सादरीकरण स्वतः रेश्मा कारखानीस आणि गायक, संगीतकार केतन पटवर्धन करणार आहेत. ‘मी शुन्य’ असे नाव असलेला हा संगीतमय कार्यक्रम रविवारी (२० ऑगस्ट) रात्री ८.३० वाजता दादरमधील शिवाजी मंदिर येथे होणार आहे. 

शून्याचा महाप्रवास कसा असतो?  शून्याने शुन्याला गुणले काय आणि भागले काय.. बेरीज केली काय किंवा वजाबाकी केली काय शेवटी उत्तर शून्यच असणार. अशी ही शुन्याची परिभाषा कवितेच्या दुनियेत एक आगळे-वेगळे रूप धारण करते. असे जीवनमूल्य मांडणाऱ्या कवितांच्या माध्यमातून वेध घेणारा हा सुरेल संगीतमय आविष्कार असणार आहे. 

प्रियल क्रिएशन्स निर्मित "मी शुन्य" या संगीतमय मैफीलीत, ‘सर्वगुण संपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा’, ‘कृष्णा पुन्हा एकदा अवतार घे’, ‘जन्मेन पुन्हा मी तुझ्या रक्षणाकरीता’, ‘काय सांगतोस भोलानाथ, पाऊस नाही पडणार का?’ यांसारख्या व्हॉट्स अॅप व फेसबुक यांच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या कवितांमुळे रसिकांच्या मना-मनात पोहोचलेल्या कवयित्री रेश्मा कारखानीस यांच्या प्रत्यक्ष काव्य सादरीकरणाचा अनोखा अविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे. 

सदर कार्यक्रमासाठी प्रवेश विनामुल्य आहे. प्रवेशिका शनिवारपासून (१९ ऑगस्ट) शिवाजी मंदिर, दादर येथे उपलब्ध होतील. 
अधिक माहितीसाठी संपर्क : दिपक सावंत ९८२०४०४८८८. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZLNBF
Similar Posts
रेश्मा कारखानीस यांचा ‘मी शून्य’ कार्यक्रम २३ जुलैला डोंबिवलीत डोंबिवली  : ‘कशाला हवेत... काना कोपऱ्यांचे दिखावी सोपस्कार, उगाच.. जळमटं साठायला.. त्यापेक्षा असावं वर्तुळाकार.. एखाद्या निर्विकार शून्यागत...!’ या आणि अशा उत्कट शब्दरचनांचे  सुरेल सादरीकरण तेही प्रत्यक्ष रचनाकर्त्याच्या तोंडून ऐकायला मिळणे याचा अनुभव काही वेगळाच असतो. कवयित्री रेश्मा कारखानीस
मुंबईची लोकल ट्रेन : रेश्मा कारखानीस यांची कविता... (व्हिडिओ) मुंबईची लोकल ट्रेन : रेश्मा कारखानीस यांनी केलेले कवितेचे सादरीकरण
दादर सांस्कृतिक मंचातर्फे ‘मोदकोत्सव’ स्पर्धा दादर (मुंबई ) : दादर सांस्कृतिक मंचातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या सहकार्याने 'मोदकोत्सव' स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रविवारी, २० ऑगस्ट रोजी दादर (पश्चिम) येथील शिवाजीपार्कजवळ असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे तळमजल्यावर दुपारी ३ वाजता ही स्पर्धा होणार आहे
रामनाथ कोविंद यांच्या निवडीबद्दल भाजप अनुसूचित जाती मोर्चातर्फे आनंदोत्सव मुंबई : रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतिपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने लाडूवाटप करण्यात आले. हा कार्यक्रम भाजपच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात झाला. या वेळी मोर्चाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language